भक्षक सिनेमातील सईच्या कामाचं भूमीने कौतुक केलं आहे. भूमीने नुकतंच इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं.

यामध्ये तिला सई ताम्हणकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना भूमी म्हणाली, ''मी नेहमीच सईच्या कामाची चाहती राहिलेली आहे. मला आठवतंय हंटर पाहताना मी तिची भूमिका खूप एन्जॉय केली.''

''जेव्हा पुलकितने मला सांगितलं की ती भक्षकमध्ये असणार आहे. मी तिच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक होते.''

''तिची भूमिका ती खूप चांगल्याप्रकारे साकारते. भक्षक सिनेमातील तिचा एक सीन मला खूप आवडला होता.''

''तिचे डोळे खूप बोलके आहेत. त्या क्षणी माझ्या डोळ्यातूनही पाणी आलं.''

दरम्यान, 'भक्षक' हा सिनेमा ९ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

या सिनेमात भूमीने वैशाली सिंह ही महिला पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकर जसमीत गौर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

VIEW ALL

Read Next Story