मल्याळम अभिनेत्याचा नुकताच रिलीज झालेला '2018: एव्हरीवन इज अ हिरो' (2023) जबरदस्त हिट ठरला आणि ₹100 कोटी क्लबमध्येही प्रवेश केला.

Sep 29,2023


टोविनो थॉमस हा मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीतला एक यशस्वी अभिनेता आहे. छोट्या भूमिका करून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि खूप कमी काळात मुख्य भूमिका साकारण्यास त्याने सुरुवात केली.


बासिल जोसेफ दिग्दर्शित मिनल मुरली (२०२१) मध्ये सुपरहिरोची भूमिका साकारणारा पहिला प्रमुख अभिनेता बनला, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला.


तर नुकताच रिलीज झालेला 2018: एव्हरीवन इज अ हिरो (2023) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आणि ₹100-कोटी क्लबमध्येही प्रवेश झाला.


टोविनो थॉमसला थल्लुमाला (2022) मधील त्याच्या अभिनयासाठी लोकप्रिय भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा SIIMA पुरस्कार मिळाला. आणि आता, तो आणखी एक पुरस्कार जिंकल्यामुळे पुन्हा चर्चेत आहे.


2018 मधील त्याच्या अभिनयामुळे त्याला मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी अॅम्स्टरडॅम येथे आयोजित सेप्टिमियस अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.


सेप्टिमियस पुरस्कार प्राप्त करणारा टोविनो थॉमस हा पहिला दक्षिण भारतीय अभिनेता आहे. सेप्टिमियस पुरस्कार हा नवीन स्वतंत्र प्रतिभा शोधण्यावर आणि त्यांना प्रोत्साहन देण्यावर भर देतात.


या निमित्ताने टोविनोने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला आणि लिहले की कधीच अपयशी न होणं यात आपलं यश नाही तर जेव्हा आपण अपयशाचा सामना करतो त्यातून वर येण्यात आहे. 2018 मध्ये जेव्हा अचानक पूर आला तेव्हाच सगळ्यांनी पाहिलं की केरळचे लोक काय करू शकतात.


आशियातला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून माझी निवड करण्यासाठी सेप्टिमीस पुरस्काराचे आभार. नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहिल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार माझ्या 2018 चित्रपटाच्या अभिनयासाठी आहे. हा केरळसाठी आहे.

VIEW ALL

Read Next Story