कोण आहे अनिल कपूरच्या घरातील 'महिला राज'?

हा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे, बिग बॅास. या शो च्या ओटीटी सीजनचं तिसरं पर्व 21 जूनला जिओ सिनेमा प्रिमियमवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

यंदाच्या वर्षी बिग बॅास ओटीटी सीजन 3 साठी सलमान खानच्या जागी अनिल कपूर या रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्तानं, 'तुमच्या घराचं बिग बॅास कोणं?' असा प्रश्न अनिल कपूरला एका मुलाखतीत विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देत, आपल्या घरचं 'बिग बॅास' पत्नी सुनीता कपूर आहे असं त्यानं सांगितलं.

मुलगी रिया, सोनम आणि पत्नी सुनीता अशा तिन्ही कमाल महिलांनी अनिल कपूरच्या घराला घरपण दिलं असून, त्याच्या घरात खऱ्या अर्थानं महिला राज आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.

दरम्यान, कायमच डॅशिंग आणि कमाल भूमिकेत दिसणारा हा एव्हरग्रीन अभिनेता आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर जादू करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

इथं सदाबहार अनिल कपूर यांच्या घरातील बिग बॉसची चर्चा असतानाच तिथं या कार्यक्रमाबद्दलही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'अब सब बदलेगा' हे यंदाच्या बिग बॅास ओटीटी सीजन 3 चं ब्रीदवाक्य आहे.

VIEW ALL

Read Next Story