लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आपण आजही पाहतो. त्यांचा असा एकही चित्रपट नाही. जो आपण मिस केला असेल.
तुम्हाला त्यांचा 'हमाल दे धमाल' हा चित्रपट तर आठवत असेलच. या चित्रपटातून अनिल कपूर यांनी कॉमिओ रोल केला होता.
परंतु तुम्हाला माहितीये का की त्यांनी या रोलसाठी किती मानधन घेतले होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल परंतु 34 वर्षांनंतर दिग्गज अभिनेत्यानं त्याचा खुलासा केला आहे.
यावेळी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीतून जयवंत वाडकरांनी याबाबत खुलासा केला आहे.
ते म्हणाले की या चित्रपटात अनिल कपूर यांनी कॉमिओ करावा अशी दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे यांची इच्छा होती. ते या चित्रपटासाठी अनिल कपूर यांना भेटायला गेले होते.
त्यांनी प्रस्ताव ऐकल्यावर लगेचच त्यांनी होकार दिला जो त्यांना अनपेक्षित होता. अनिल कपूर हो म्हणतील अशी शक्यताही त्यांना वाटली नव्हती. त्यांच्यासाठी हा सुखद धक्का होता.
यावेळी त्यांनी एक आपली खंतही व्यक्त केली होती. ते म्हणाले की अशाप्रकारचं बॉण्डिंग हे कलाकारांमध्ये आता पाहायला मिळणार नाही.