किती ओळखता येतात?

तुम्हाला या 10 हॉलिवूड अभिनेत्यांपैकी नेमके किती अभिनेते भारतीय संताच्या अवतारामध्ये ओळखता येतात हे कमेंट करुन नक्की सांगा.

'स्टार वॉर्स' फेम अभिनेता ओळखला का?

'स्टार वॉर्स', 'ब्लेड रनर' सारख्या चित्रपटांमधून चमकलेला हा अभिनेता कोण हे ओळखलं का? हा आहे हॅरिसन फोर्ड. एआयच्या माध्यमातून बनवलेला हा हॅरिसनचा अवतार फारच सूट होणार आहे ना? हे सर्व फोटो वाइल्ड ट्रान्स (wild trance) नावाच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेत.

गायक, निर्माता, अभिनेता अन् आता संत

प्रसिद्ध रॅप गायक, निर्माता आणि 'मॅन इन ब्लॅक', 'इंडिपेंडन्स डे' सारख्या दमदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारा हा अभिनेता कोण ओळखलं का? अहो हा आहे, विल स्मिथ! कसा वाटतोय विल भारतीय साधूच्या रुपात?

'तो' भारतीय अवतारात असाच दिसला असता ना?

'फॉरेस्ट गम्प', 'कास्ट अवे'सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता आहे टॉम हॅक्स. टॉम भारतीय साधू असता तर असाच दिसला असता. हे सर्व फोटो आर्टिफिशिएल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेत.

'टायटॅनिक'वाला हिरो

'टायटॅनिक'वाला हिरो अशी ओळख आजही कायम असलेला अमेरिकन अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रिओला ऑस्कर्स पुरस्कार विजेता आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारापासून ते बाफ्टा पुरस्कार पटकावणाऱ्या या अभिनेत्याचा साधू लूक कसा वाटला?

दोनदा गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेता

या अभिनेत्याने एकदा नाही तर दोन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटावले आहेत. ओळखा कोण पाहू? नाही समजलं? हा आहे, रॉबर्ट डाउनी ज्युनिअर! रॉबर्टचा हा साधू लूक आवडला का?

आपण यांना ओळखलं का?

या व्यक्तीला ओळखलं का? 'अप इन द एअर', 'ग्रॅव्हिटी' आणि 'ओशन्स इलेव्हन'सारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणार हा अभिनेता आहे जॉर्ज क्लूनी!

भारतीय अवताराचं 'मिशन पॉसिबल'

'मिशन इम्पॉसिबल' सिरीजमधील मुख्य अभिनेता टॉम क्रूज भारतात येऊन साधू झाला तर तो नक्कीच असा दिसेल. हो की नाही?

अनेकांच्या ओळखीचा चेहरा भारतीय अवतारात

ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते, निर्माते मॉर्गन फ्रीमॅन यांचा भारतीय संत रुपातील हा लूक कसा वाटला?

अनेकांना आवडला हा देसी ब्रॅड पीट

अमेरिकन निर्माता आणि अभिनेता ब्रॅट पीटचा हा इंडियन लूक तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आर्टिफिशिएल इंटेलिजन्सचा वापर करुन हे फोटो तयार केले आहेत.

हा अभिनेता कोण ओळखलं का?

मूळचा कॅनडियन असलेला कीनू रीव्सचा हा साधू लूक कसा वाटतोय? अनेकांना त्याचा हा अवतार आवडलाय. हे फोटो वाइल्ड ट्रान्स (wild trance) नावाच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेत.

Hollywood मधील अभिनेते भारतीय संत असते तर...

सध्या सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल झाले असून या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. यापैकी किती हॉलिवूड स्टार्स तुम्हाला ओळखता येतात सांगा पाहू

VIEW ALL

Read Next Story