आर्चीला आवडतो 'हा' 20 रूपयाचा पदार्थ!
सैराटमुळे एक नवी ओळख मिळालेली सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर अॅक्टिव असते.
सैराट या तिच्या पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपट देखील मिळाले.
रिंकू राजगुरू अतिशय आकर्षक, सुंदर आणि भन्नाट फोटो शेअर करत असते. त्यामुळे आता तिच्या फिटनेसचं देखील कौतूक होताना दिसत आहे.
एकीकडे फिटनेसवर लक्ष देत असताना रिंकूने आपल्या खाण्याच्या सवयी मात्र बदलल्या नाहीत.
रिंकू पिझ्झा, बर्गर आवडतो, असं म्हटलं तर त्याला साफ खोटं ठरवा. रिंकूला पिझ्झा बर्गर अजिबात आवडत नाही.
पिझ्झामधली खालचा बेस मी खाऊ शकते पण पिझ्झा नाही, असं आर्ची सांगते.
पिझ्झा किंवा बर्गरपेक्षा मला 20 रुपयाची भेळ खायला आवडते, असंही रिंकूने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
सैराटनंतर रिंकूने कागर, आठवा रंग प्रेमाचा, झुंड, मेकअप सारख्या अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.