दुसऱ्या लग्नानंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत

जवळपास दोन आठवड्यांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता रविंदर चंद्रशेखरन यांना करोडोंचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

रविंदर सध्या न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, रविंदर हे आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात.

रविंदर यांनी गतवर्षी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मी शंकरशी दुसरं लग्न केलं.

दरम्यान पतीच्या अटकेनंतर अभिनेत्री सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे.

काही दिवसांपूर्वी तिने साडीमधील एक फोटो शेअर केला होता. यावेळी कॅप्शनमध्ये तिने 'ही वेळही निघून जाईल' असं लिहिलं होतं.

यानंतर अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, 'माझं मन दरवेळी तुला शोधत आहे'.

एकामागोमाग पोस्ट शेअर केल्यानंतर तिने इंस्टाग्रामला एक नवा फोटो शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, 'कधीही पराभव पत्करु नका'.

महालक्ष्मीच्या इतक्या साऱ्या पोस्ट पाहिल्यानंतर युजर्स तिला ट्रोल करत आहेत. पती जेलमध्ये आहे आणि ही पोस्ट शेअर करत बसली आहे असं युजर्स म्हणत आहेत.

दरम्याने एकाने म्हटलं आहे की, सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा आपल्या समस्येवर तोडगा काढा.

काहींनी तर त्यांच्या लग्नावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान महालक्ष्मी आता या ट्रोलर्सना काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.

VIEW ALL

Read Next Story