जेव्हा तुम्ही नव्या देशात जाता तेव्हा नव्याने सर्व गोष्टी शिकता. हा एक वेगळा अनुभव आहे असं एरिकाने म्हटलं आहे.
एरिक सध्या दुबईत असून तेथील फोटो शेअर करत आहे. एरिकाने तिथे Dining in the Sky मध्ये स्पेशल डिनरही केला. दुबई सुंदर जागा असल्याचं एरिका सांगते.
दुबई माझ्या घरासारखी असून मी कंफर्ट झोनच्या बाहेर येतील असं वाटत नाही. येथे माझं कुटुंब आहे, त्यामुळे येथे राहण्याचा निर्णय काळजीत पाडणारा नाही. पण मी कामासाठी भारतात येत राहणार आहे असं तिने सांगितलं आहे.
एरिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या निर्णयामागील कारण सांगितलं आहे. मी प्रगतीसाठी संधी शोधत होते. तुम्ही किती काम करता हे महत्त्वाचं नाही. अजून का? पुढे काय? हे महत्त्वाचं असून थोडं अडकल्यासारखं वाटत होतं असं तिने सांगितलं आहे.
एरिका फर्नांडिस आतापर्यंत मुंबईत स्थायिक होती. पण आता तिने मुंबई सोडून दुबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.
'कसौटी जिंदगी की' फेम एरिका फर्नांडिस ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण आता तिच्याबद्दल एका आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.