मनोरंजन क्षेत्रातून धक्कादायक बातमी

मनोरंजन क्षेत्रात अनेकदा अनेक गोष्टी या घडताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते.

Sep 06,2023

फेक न्यूजनं खळबळ

त्यातून फेक न्यूज वाढायला फार काही वेळही लागत नाही. सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या मृत्यूच्या फेक न्यूजनं फार मोठी खळबळ माजवून दिली आहे.

मृत्यूची अफवा

त्यातून यावेळी या अभिनेत्रीनं तिच्या या मृत्यूच्या अफवेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री सुखरूप

यावेळी द न्यूज मिनट तिनं दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ती सुस्थिती आहे आणि कोण म्हणतंय माझा मृत्यू झाला मी ठणठणीत आहे, असं म्हटलं आहे.

मुलाखतीत खुलासा

द न्यूज मिनटच्या धान्या राजेंद्रन यांनी एक ट्विट केले होते की, 'दिव्या स्पंदना सध्या जिनिव्हामध्ये आहे. ज्यांनी कुणी ही अफवा पसरवली आहे, त्यांना लाज वाटायला हवी'

मी बराच वेळ तिला कॉल...

'मी बराच वेळ तिला कॉल करत होते. ती उचलत नसल्यामुळे मला काळजी वाटू लागली होती. पण शेवटी तिनंच फोन उचलला आणि मी म्हटलं तू जिवंत आहेस हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला', असंही पुढे या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

ट्विट व्हायरल

काँग्रेसचे तामिळनाडू अध्यक्ष केटीएल यांनीही एक ट्विट लिहिलं आहे.

चाहत्यांनी वाहिली श्रद्धाजंली

आज दिवसभर तिच्या मृत्यूची चर्चा रंगली होती. काही चाहत्यांनीही तर तिला श्रद्धाजंलीही वाहिली होती.

बातमी खोटी

परंतु ही बातमी खोटी असून त्या जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत. कॉंग्रेसच्या आयटी सेलमध्ये त्या सक्रीय आहेत. त्या कन्नड चित्रपटातही कामं करत होत्या.

VIEW ALL

Read Next Story