म्हणते, त्यांनी 'जबरदस्ती माझा फोन...'
महाराष्ट्राची हास्यजत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमातून चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या शिवालीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
शिवाली सोशल मीडियावर अँक्टिव असल्याचं दिसून येतं. शिवालीने नेहमी वेगवेगळे अनुभव शेअर करत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने एका प्रसंगाविषयी सांगितलं होतं.
मी ट्रेनमधून प्रवास करत होते. तिथे एक काकू भेटल्या. त्यांनी माझी खूप आपुलकीने चौकशी केली, असं शिवाली म्हणते.
मला माझ्या कुटुंबाबद्दल विचारलं. माझ्याबद्दल सगळी माहिती घेतली मात्र नंतर त्या माझा फोन नंबर घेण्यासाठी मागेच लागल्या, असं शिवाली म्हणते.
आधी तर त्या माझ्याशी शांतपणेच बोलत होत्या. मात्र नंतर त्या माझ्या मागेच लागल्या. मला नंबर दे म्हणून बोलू लागल्या. अशा वेळेला तोंडावर नकार द्यायलाही आपल्याला वाईट वाटतं.
पण मी नाही म्हणत असतानाही त्यांनी जबरदस्ती माझा फोन नंबर घेतला. हा त्यांनी कधीही मला कॉल करून त्रास दिला नाही.
काकूंचा तो अनुभव माझ्यासाठी वेगळा आणि न विसरता येण्यासारखाच होता, असं शिवाली म्हणाली.