एवढेच नाही तर आराध्या बच्चनला या शाळेत शिकण्यासाठी इतकी फी भरावी लागते
ज्यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंब कोणतीही आलिशान कार खरेदी करू शकतात तेवढी या शाळेची फी आहे.
मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते.
अहवालांवर विश्वास ठेवला तर, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही देशातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे.
या शाळेच्या फीबद्दल बोलायचे झाले तर या शाळेची वार्षिक फी हजारात नाही तर लाखात जाते.
या शाळेत एलकेजी ते सातवीपर्यंतची फी १ लाख ७० हजार रुपये आहे. तर इयत्ता 8वी ते 10वीसाठी 4.48 लाख रुपये आणि 11वी ते 12वीसाठी 9.65 लाख रुपये शुल्क आहे.
या शाळेत अजूनही अनेक कलाकारांची मुले शिक्षण घेतात.