अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा कायमच चर्चेत असतो. 'नवे लक्ष्य' या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला.
सोहमने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. आई-वडिलांप्रमाणेच सोहमचा चाहतावर्गही मोठा आहे.
नुकतंच सोहमने इन्स्टाग्रामवर आस्क मी समथिंग सेशन घेतले. यावेळी त्याला त्याच्या चाहत्यांनी करिअरसह खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले.
यावर त्याने फारच मनमोकळेपणाने उत्तर देत संवाद साधला. यादरम्यान त्याला तुमची शैक्षणिक पात्रता काय असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर सोहमने काय योग्य आणि काय चूक हे जाणून घेण्याएवढं पुरेसे असलेले माझं शिक्षण आहे आणि मला आशा आहे की ते पुरेसे आहे”, असे म्हटले.
सोहम हा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.
अभिनयाबरोबरच सोहमने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेची निर्मिती सोहमने केली आहे.
तसेच आता लवकरच 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची निर्मितीही तो करणार आहे.