संगीताची जादू

ए. आर. रेहमान हे आपले सगळ्यांचे आवडते संगीतकार आहेत. त्यांच्या संगीताची जादू ही देशभरातच नाही तर अख्ख्या जगात आहे.

ऑस्कर पुरस्कारनं सन्मानित

त्यांना ऑस्कर पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

ए. आर. रेहमान घराणेशाहीवर काय म्हणाले?

घराणेशाही हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला जातो. त्यातून याविषयी ए.आर. रेहमान यांनी 'द हिंदू'शी बोलताना याबद्दल आपली स्पष्ट भुमिका मांडली आहे.

घराणेशाहीवर तिखट प्रतिक्रिया

''आजकाल लोकांनी एक नवीन संकल्पना वापरायला सुरूवात केली आहे आणि ती म्हणजे घराणेशाही ही. मी स्वत:च्या बळावर माझ्या सर्व गोष्टी उभारल्या आहेत, हे माझं संपूर्ण विश्व आहे.''

'...नाहीतर सगळं काही गोदाम बनून राहिल.''

''जर माझी मुलं या क्षेत्रात काम करत नसती किंवा त्यांनी माझा हा वारसा पुढे नेला नाही तर हे सगळं काही केवळ गोदाम या अर्थी बनून राहील.''

वारसा

''माझ्या स्टुडिओमधील प्रत्येक भिंतीचा एकेक इंच, एकेक खुर्ची अत्यंत काळजीपूर्वक आणि आवडीने निवडली गेली आहे. माझ्या मुलांनी भविष्यात हाच वारसा पुढे न्यावा अशी माझी इच्छा आहे'', असे ते म्हणाले आहेत.

मुलीची गाणी

ए. आर. रेहमान यांची मुलगी खतिजा रेहमान हिनं नुकत्याच आलेल्या मणिरत्नम यांच्या PS 2 या चित्रपटात गाणा गायली आहेत.

चित्रपटांसाठी गाणी संगीतबद्ध

सध्या त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. ए. आर. रेहमान यांनी 'पोन्नियिन सेल्वन', 'दिल बिचारा', ‘मामन्नान’ अशा चित्रपटांसाठी गाणी संगीतबद्ध केली आहेत.

VIEW ALL

Read Next Story