चित्रपट सामान्यपणे सरासरी 3 तासाचे असतात. मात्र पॉपकॉर्न, कोल्ड ड्रींक्स संपून जातील तरी संपणार नाहीत अशा लांबलचक चित्रपटांची यादी पाहिलीत का?
'मेरा नाम जोकर' या चित्रपटामध्ये एकूण 28 गाणी आहेत. या चित्रपटाची लांबी 4 तास 4 मिनिटं इतकी आहे. चित्रपटाला 2 इंटरव्हल होते.
'ऑस्कर'चं नामांकन मिळालेला 'लगान' चित्रपट चांगलाच गाजला होता. आमिर खानच्या या चित्रपटाची लांबी 3 तास 44 मिनिटं इतकी आहे.
हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेऊन बनवलेला 'सलाम-ए-इश्क' हा चित्रपट तिकीटबारीवर आपटला. या चित्रपटाची लांबी 3 तास 36 मिनिटं इतकी आहे.
अशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि ऋतिक रोशन व ऐश्वर्या रायच्या अभिनयाने नटलेला 'जोधा अकबर' हा चित्रपट 3 तास 34 मिनिटं लांबीचा आहे.
करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या 'कभी अलविदा ना केहना' या चित्रपटातही शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन सारखी तगडी स्टारकास्ट होती. हा चित्रपट 3 तास 35 मिनिटं लांबीचा आहे.
'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट एकूण 5 तास 19 मिनिटांचा आहे. एवढा मोठा चित्रपट प्रदर्शित करण्यास कोणी तयार होईना म्हणून त्याचे 2 भाग करण्यात आले.
'मोहब्बते' या मल्टीस्टारर चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय असे बडे कलाकार आहेत. हा चित्रपट तब्बल 3 तास 36 मिनिटं लांबीचा आहे.