तुम्ही सर्वात श्रीमंत सीईओ म्हटले की तुमच्यासमोर सुंदर पिचई किंवा सत्या नाडेला यांचा चेहरा येत असेल. मात्र ही वर दिसणारी व्यक्ती दर मिनिटाला 7 हजार 700 रुपयांहून अधिक कमवते. ही व्यक्ती कोण ते पाहूयात
माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील जगातील सर्वात प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक म्हणजे IBM! याच कंपनीच्या सीईओंबद्दल आपण बोलणार आहोत.
आता ही कंपनी इतकी प्रसिद्ध असल्याने या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO हे श्रीमंत असणार यात शंका नाही.
आयबीएमचे सीईओ आहेत अरविंद कृष्णा. अरविंद यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर एलीनोईस विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली.
अरविंद कृष्णा हे 1990 पासून आयबीएमसाठी काम करतात. त्यांनी कंपनीत वेगवेगळ्या पदांवरील जबाबदारी पार पाडली. 2020 पासून ते कंपनीचे सीईओ आहेत.
अरविंद कृष्णा यांना 2022 साली कंम्पसेशन म्हणून कंपनीने 16.5 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम दिली. भारतीय चलनात हे मूल्य 135 कोटी इतकी होते.
हा पगार वर्ष आणि दिवसानुसार आकडेमोड करुन पाहिला तर महिन्याला अरविंद कृष्णा यांना 11.25 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच दिवसाला 37 लाख रुपये पगार ते घेतात.
अरविंद कृष्णा यांच्याकडे कंपनीचे 2 मिलियन डॉलर्सच्या शेअर्सही आहेत.
अरविंद कृष्णा यांच्या नावावर 15 पेटंट असून आयबीएमच्या विकासामध्ये अरविंद कृष्णा यांचा मोठा वाटा आहे.