जागीच मृत्यू

शुटिंगवरुन घरी येताना त्यांनी बाइक बूक केली होती. एका लॉरीने बाईकला धडक दिल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला.

सुचंद्रा दासगुप्ता यांना लॉरीने उडवलं

29 वर्षांची बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

RRR मधील रे स्टीवनसन यांचं निधन

RRR मध्ये नकाकात्मक भूमिका निभावणारे हॉलिवूडमधील अभिनेते रे स्टीवनसन यांचंही निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते.

ड्रग्जचं अतीसेवन?

अंधेरीमधील घरात आदित्यचा मृतदेह आढळला होता. मृत्यूच्या काही तास आधी त्याने पार्टी केली होती. यावेळी ड्रग्जचं अतीसेवन केल्याने मृत्यू झाल्याचा दावा आहे.

आदित्य सिंग राजपूतचं निधन

अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचं 22 मे रोजी निधन झालं.

कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू

नितेश पांडे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.

नितेश पांडे यांचं निधन

अभिनेता नितेश पांडे यांचं वयाच्या 51 व्या वर्षी निधन झालं आहे. सध्या 'अनुपमा' मालिकेत काम करणारे नितेश पांडे यांचं कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.

कार 50 फूट खोल दरीत कोसळली

वैभवी उपाध्याय आपल्या होणाऱ्या पतीसोबत हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेली होती. यावेळी नियंत्रण सुटल्याने त्यांची कार 50 फूट खोल दरीत कोसळली. वैभवीचा जागीच मृत्यू झाला.

वैभवी उपाध्यायचा मृत्यू

'साराभाई व्हर्सेस साराभाई'मधील अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. तिची कार 50 फूट खोल दरीत कोसळून निधन झालं.

मनोरंजनसृष्टीवर शोककळा

मृत्यू अटळ असून तो कधी येईल काही सांगता येत नाही. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा बसणारा धक्का मात्र मोठाच असतो. असाच काहीसं चित्र सध्या मनोरंजनसृष्टीत आहे. गेल्या 4 दिवसांत 5 सेलिब्रिटींचं निधन झालं आहे.

VIEW ALL

Read Next Story