मदर इंडिया (1957)

ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट'मदर इंडिया'.या सिनेमात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राज कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८ कोटींचा गल्ला जमवला होता.

मुघल-ए-आझम (1960)

बॉलिवूडमधील ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'मुघल-ए-आझम'. के. आसिफ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार व मधुबाला हे प्रमुख भूमिकेत होते. १.५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने 11 कोटीं कमवले होते.

शोले (1975)

बॅाक्स ऑफिसवर 50 कोटी कमवणारा 'शोले' हा रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र,संजीव ठाकूर, हेमा मालिनी यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटामधील डायलॉगही ब्लॉकब्लास्टर ठरले होते.

हम आपके है कौन..!(1994)

1990 च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा 'हम आपके है कौन'हा चित्रपट होता. 120 कोटी रुपये कमवून 'शोले'चा रेकॅार्ड ब्रेक केला.

'गदर एक प्रेम कथा' (2001)

'गदर एक प्रेम कथा' (2001)

गजनी (2008)

2005 च्या तमिळ चित्रपटाचा रिमेक असलेला अमीर खानच्या गजनी चित्रपटाने तब्बल १६२ कोटी रुपये कमवून गदरचा रेकॉर्ड मोडला.

3 इडियट्स (2009)

राजकुमार हिरानीने दिग्दर्शित केलेल्या ३ इडियट्सने 281 कोटी रुपये कमवले, गजनी चा रेकोर्ड मोडून लगेच २००९ मध्ये अमीर खानने नवा इतिहास रचला.

चेन्नई एक्सप्रेस (2013)

रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्सप्रेस या ऍक्शन मूव्हीने 282 कोटी कमवून धुमाकूळ घातला होता.

'धूम ३'(2013)

चेन्नई एक्सप्रेस नंतर अमीर खान आणि अभिषेक बचनच्या धूम ३ या चित्रपटाने त्याच वर्षी ३७२ कोटी रुपये कमवले.

'PK'(2014)

अमीर खानने pkया चित्रपटातून स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला, राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने एकूण ५०७ कोटी रुपये कमवले.

दंगल (2016)

अमीर खानने pkनंतर लगेच २ वर्षांनी त्याच्या नव्या चित्रपटातून ५३८ कोटी कमवून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

पठाण (2023)

शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण या चित्रपटाने दंगलचा रेकॉर्ड मोडून ३ कोटी कमवले.

जवान (2023)

पठाण च्या रेकॉर्ड ब्रेकनंतर शाहरुखचा जवान हा चित्रपट अवघ्या आठ महिन्यात रिलीज झाला, जावनने बॉक्स ऑफिसवर ७६१ कोटी रुपये कमवले.

VIEW ALL

Read Next Story