क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद बॉलर कोणते? पाहा स्पीड

Apr 08,2024

शोएब अख्तर

पाकिस्तानचा शोएब अख्तर हा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 2003 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 161.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत त्याने नवा विक्रम रचला होता.

शॉन टेट

ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटने 2010 मध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. 161.2 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत त्याने शोएब अख्तरशी बरोबरी केली होती.

ब्रेट ली

शॉन टेट प्रमाणे ब्रेट ली हा देखील ऑस्ट्रेलियाचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने 161.1 प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.

जेफ्री थॉमसन

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने 160.6 प्रतितास वेगाने 1975 मधील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विक्रम रचला.

मिचेल स्टार्क

2015 मध्ये न्युझीलंडच्या विरुद्ध सामन्यात त्याने 160.4 किमी प्रतितास गोलंगाजी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील वेगवन गोलंदाज म्हणून त्याला लोकप्रियता मिळाली.

अँडी रॉबर्ट्स

1975 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी त्याने दमदार कामगिरी केली. 159.5 किमी प्रतितास वेगवान गोलंदाजी करत अँडी रॉबर्ट्स नवा विक्रम रचला.

फिडेल एडवर्ड्स

वेस्ट इंडिजच्या हा गोलंदाज वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या सामन्यात 157.7 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.

मिचेल जॉन्सन

2013 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 156.8 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

मयंक यादव

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात मयंक यादवने 156.7 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.

मोहम्मद सामी

2003 झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने 156.4 किमी प्रतितास वेगवान गोलंगाजी केली होती.

VIEW ALL

Read Next Story