पाकिस्तानी क्रिकेटरसुद्धा पाहतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट

22 जानेवारीला दुपारी 12.30 वाजता आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

राम मंदिरात 15 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली असून भारताप्रमाणे जगभरातील अनेक लोक राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा होण्याची वाट पाहत आहे.

या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मनोरंजन, राजकीय, व्यवसायिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमास सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असून त्याच्यासोबत विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान टीमचा माजी क्रिकेटर दानिश केनेरिया हा देखील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी उत्साही आहेत.

केनेरियाने 14 जानेवारीला सोशल मिडायावर स्वत:चा एक फोटो शेयर केला आहे. त्यात भगवान रामांचा ध्वज त्याने हातात घेतला आहे.

केनेरियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे- राजा श्रीराम का भव्य मंदिर है तयार, अब सिर्फ 8 दिन का है इंतजार बोलो जय जय श्री राम.

केनेरिया अनिल दलपत नंतर पाकिस्तान टीम मधून खेळणारे दूसरे हिंदू खेळाडू आहेत. त्याने आजपर्यंत 61 टेस्ट आणि 18 वनडे सामने खेळले आहेत.

VIEW ALL

Read Next Story