5 जून 2024 पासून टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचा सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत.
यंदाची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार यासंदर्भात आतापासूनच चर्चा सुरु असताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्ननेही भाकित व्यक्त केलं आहे.
मात्र मायकल वॉर्नने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम 4 मध्ये नसेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
मात्र मायकल वॉर्नने सोशल मीडियावरुन सेमीफायनल गाठू शकतील असे 4 संघ कोणते वाटतात हे सांगितलं आहे.
भारताबरोबरच वॉर्नच्या मते पाकिस्तानचा संघही टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलआधीच बाहेर फेकला जाईल.
मायकल वॉर्नने आपली पहिली पसंती इंग्लंडच्या संघाला दर्शवली आहे.
ऑस्ट्रेलिया हा टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असेल असा अंदाज वॉर्नने व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने 2023 मध्ये भारतात झालेला एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला आहे.
वॉर्नने दक्षिण आफ्रिकेचा संघही अंतिम 4 मध्ये असेल असं म्हटलं आहे.
तर सेमी फायनल खेळणारा चौथा आणि अंतिम संघ हा वेस्ट इंडिजचा असेल असं वॉर्नचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे मागील पर्वासाठी वेस्ट इंडिजचा संघ पात्रही ठरला नव्हता आणि यंदा वॉर्नने थेट टॉप 4 मध्ये या संघाला स्थान दिलं आहे.