पुढच्या सामना विशाखापट्टनममध्ये

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला एकदिवसीय सामना 17 मार्चला, तर दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टनम इथं 19 मार्चला आणि तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईत 22 मार्चाल खेळवला जाणार आहे.

शमीच्या जोडीला सिराज

तर वेगवान गोलंदाची धुरा टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी सांभाळेल. त्याच्या जोडीला मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकटला संधी मिळण्याची शक्यता आहे.

रवींद्र जडेचाचं स्थान निश्चित

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकणारा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेचाची प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा पक्की आहे. त्याच्या जोडीला अक्षर पटेल किंवा युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते.

मधल्या फळीत दमदार फलंदाज

याशिवाय मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या फलंदाजीची धुरा सांभाळतील. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या मालिकेतून आऊट झाला आहे.

टीम इंडियाची सलामीची जोडी ठरली

टीम इंडियाची सुरुवात शुभमन गिलबरोबर (Shubaman Gill) ईशान किशन (Ishan Kishan) करणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार पांड्याने ईशान किशनच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

हार्दिक पांड्या करणार नेतृत्व

मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नसल्याने शुभमन गिलबरोबर पहिल्या सामन्यात सलामीला कोण येणार यावर प्रश्नचिन्ह होतं. पण कर्णधार पांड्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Austalia ODI Series) 17 मार्चपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणारी आहे. रोहित शर्माला पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story