आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हटले जाते
वर्षातील एकूण 24 एकादशी पैकी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी हे सगळ्यात महत्त्वाचे एकादशी मानले जातात.
शास्त्रानुसार या दिवशी उपवास करून भगवान विष्णुचे नामस्मरण केल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते.
एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नका.
उपवास या शब्दाचा अर्थ 'उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे.
यादिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाणं टाळा
हा उपवास एकादशीच्या आदल्या दिवशी धरायचा आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा
उपवास सोडण्याची योग्य वेळ गुरुवार सकाळी 5.46 मि.पासून ते 8.06 मि.पर्यंत आहे.
वाघाट्याची भाजी ही आषाढी एकादशीला उपवास सोडताना बनवली जाते. ही रानभाजी फक्त आषाढ महिन्यात येते.