तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाल्यास स्थानिक कोर्टात निराकरण
नवी दिल्ली : काही जणांच्या बाबतीत चेकच्या समस्या येतात. तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाल्यास तक्रार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र, आता तक्रार स्थानिक पातळीवर करता येणार आहे.
एखाद्याने दिलेला धनादेश (चेक) परत गेल्यास किंवा बाउन्स झाल्यास त्याविषयीची तक्रार हायकोर्टात करण्याऐवजी स्थानिक पातळीवर करता येणार आहे. याविषयीच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट (सुधारणा) कायदा, २०१५ ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिलेय. यामुळे नव्या वर्षात चेक बाउन्सच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने होणार आहे.
देशात चेक बाउन्स होण्याच्या १८ लाख घटना घडल्या आहेत. न्यायालयात गेलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी विलंब होत आहे. हा विलंब टाळण्यासाठी चेक मिळालेल्या पण तो बाउन्स झाल्याने पैसे न मिळालेल्या व्यक्तीची बँक कार्यरत असलेल्या परिक्षेत्रातील स्थानिक कोर्टातच त्याविरोधात तक्रार करावी लागणार आहे.
तक्रार ज्या कोर्टात दाखल केली जाईल, त्याच कोर्टात त्या व्यक्तीविषयीच्या सर्व तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत. त्यामुळे व्यक्ती कोठे राहते या मुद्दा गौण ठरणार आहे. कायद्याचे परिक्षेत्र वेगळे असले तरी ते विचारात घेतले जाणार नाही. यालाही राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे.
तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाल्यास स्थानिक कोर्टात निराकरण