कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचले
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. डोंबिवली स्टेशन परिसरातील नेहरू रोड परिसरात पुन्हा पाणी साचलं आहे. दुकानामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांता तारांबळ उडाली आहे.
आज सकाळपासून कल्याण डोंबिवली मध्ये पावसाची रिपरिप सुरू होते मात्र तासाभरापासून पावसाने चांगला जोर धरलाय. अनेक भागात पुन्हा एकदा पाणी साचल्याने दुकानामध्ये पाणी शिरले आहे. नालेसफाई केल्यानंतर कचऱ्याचा ढीग नाल्याच्या बाजुलाच असल्याने आता तो पुन्हा एकदा नाल्यात वाहून जात आहे. यामुळे महापालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात दिसून येत आहे.
कल्याण पूर्व भागात नाल्याला लागून असलेल्या चाळींमध्ये पाणी जमा होण्यास सुरु झाले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने आणि पावसाचा जोर ही कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण अनेक ठिकाणी अजून प्रशासनाकडून कोणतीही माहिती किंवा सावधगिरीचा उपाय म्हणून कोणतीही उपाययोजना दिसत नाहीये.
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचले