धावत्या मेट्रोत लग्न करण्याचा आनंद घ्या, खर्च हॉलपेक्षाही कमी

लग्न समारंभ किंवा घरगुती कार्यक्रम म्हटलं की, सर्वांत आधी शोधवा लागतो तो एक चांगला हॉल.

Updated: Aug 30, 2021, 11:03 AM IST
धावत्या मेट्रोत लग्न करण्याचा आनंद घ्या, खर्च हॉलपेक्षाही कमी title=

येरवडा : लग्न समारंभ किंवा घरगुती कार्यक्रम म्हटलं की, सर्वांत आधी शोधवा लागतो तो एक चांगला हॉल. पण यासाठी जर तुम्हाला एखादी धावती मेट्रो मिळाली तर... होय, आता हे शक्य होणार आहे.  नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत धावत्या मेट्रोमध्ये तुम्ही वाढदिवस साजरा करु शकणार आहात.

लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा विवाहाचा वाढदिवस, प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या विशेष दिवस साजरा करण्यासाठी मेट्रोचा वापर करता येणार आहे. त्यात पण अल्प शुल्कात पुणेकरांना विविध कार्यक्रम धावत्या मेट्रोमध्ये साजरा करता येणार आहेत.

डिसेंबर अखेर मेट्रो रेल्वे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते वल्लभनगर आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय दरम्यान धावणार आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रो मेट्रोमध्ये लहान मोठे वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देणार आहे.

काय आहेत उपक्रम...

- विवाहाची बोलणी, साखरपुडा
- विवाहाचा वाढदिवस
- लहान मुलांचे व ज्येष्ठांचे वाढदिवस
- खर्च सभागृहाच्या भाड्यापेक्षाही कमी असणार

महामेट्रो अशा प्रकारचे अभिनव उपक्रम नागपूर मेट्रोमध्येही राबविते.विविध उपक्रम पुणे मेट्रोच्या तीस स्थानकांत राबविण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.