धक्कादायक : 3 वर्षात चार टक्याहून अधिक जवानांनी सोडली नोकरी
मुंबई : सरकार संरक्षणातील बजेटमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशातील जवानांना अधिकाधिक सुविधा देण्याचा दावा केला जात आहे. मात्र नोकरी सोडणाऱ्या जवानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि याच कारण काही तरी वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन वर्षात पॅरामिलिट्री फोर्समध्ये नोकरी सोडण्याचा ट्रेंड 4 टक्यांनी वाढला आहे.
चांगल्या करिअरच्या शोधात गेल्या 3 वर्षात 14,587 अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी स्वेच्छेने सैनिक दलातील नोकरी सोडली आहे. हा आकडा 2015 ते 2017 चा आहे. गृहमंत्रालयाकडून जाहिर केलेल्या रिपोर्टनुसार 2017मध्ये बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि रायफलच्या 14,587 जवान आणि अधिकाऱ्यांनी रिटार्यमेंट घेतली आहे. 2015 मध्ये हा आकडा 3425 इतका होता.
हे आहे खर कारण
द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जवान आणि अधिकाऱ्यांची नोकरी सोडण्याची सुरूवात 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जवान उत्तम नोकरीच्या शोधात प्रायव्हेट सेक्टरकडे वळत आहे.
ही आहे आकडेवारी
आकड्यांचा अभ्यास केला तर सीआरपीएफ आणि बीएसएफ जवानांचा नोकरी सोडण्याचा ट्रेंड सर्वाधिक आहे. 2015 मध्ये सीआरपीएफच्या 1376 जवानांनी नोकरी सोडली तर 2017 मध्ये हा आकडा वाढला असून 5123 पर्यंत पोहोचला आबे. अशीच अवस्था बीएसएफच्या जवानांबाबत आहे. 2015 मध्ये हा आकडा 909 बीएसएफ जवानांबाबत होता. तर 2017 मध्ये हा आकडा 6400 पार करून पुढे गेला आहे.
धक्कादायक : 3 वर्षात चार टक्याहून अधिक जवानांनी सोडली नोकरी
2017 मध्ये 14,587 जवानांनी सोडली नोकरी
2015 मध्ये हा आकाडा 3425 इतका होता
यासाठी सोडली नोकरी