20 वर्षांनी लहान पुतण्यासोबत काकीचे अनैतिक संबंध, पतीनेच पुढाकार घेत लावले लग्न
बिहारः 20 वर्षांच्या पुतण्याने त्याच्या 40 वर्षांच्या काकीसोबत लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर 40 वर्षांच्या महिलेचे लग्न तिच्याच पतीने लावून दिलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील लाखापूर गावात हा प्रकार समोर आला आहे.
40 वर्षांच्या या महिलेला २ मुलं देखील आहेत. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते. शनिवारी रात्री तिच्याच पतीने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पतीने दोघांचेही लग्न लावून दिले. गावकऱ्यांच्या समोरच काली मंदिरात दोघांचे लग्न करुन देण्यात आले.
लखापुर गावातील इंद्रदेव पासवान याची पत्नी रुबी देवीचे तिच्याच पुतण्यासोबत विवाहबाह्यसंबंध होते. पुतण्याचे नाव पंकज पासवान असून त्याचे वय 20 वर्ष इतके आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघंही गुपचुप भेटत होते. शनिवारी रात्री तिच्याच पतीने तिला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर दोघांनाही पकडून गावकऱ्यांसमोर उभे केले.
या घटनेनंतर गावकऱ्यांनी पंचायत बोलवली. पंचायतच्या बैठकीत पंकज आणि रुबी दोघांनीही एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर महिलेच्या पतीने स्वतःच पुढाकार घेत गावातील काली मंदिरात हिंदू रिती-रिवाजानुसार दोघांचे लग्न लावून दिले. त्यांच्या या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, या लग्नाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. तसंच, या दोघांना गावातून घेऊन जाण्याची मागणीदेखील त्यांनी केली होती. मात्र, रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं परिसरात एकच तणाव पसरला होता.
काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीमुळं गावात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोघांचेही गेल्या तीन वर्षांपासून संबंध आहेत. दोघंही गावाच्या बाहेर गुपचुप भेटत असतं. शनिवारी रात्री दोघांनाही अश्लील कृत्ये करताना रंगेहाथ पकडण्यात आले.
20 वर्षांनी लहान पुतण्यासोबत काकीचे अनैतिक संबंध, पतीनेच पुढाकार घेत लावले लग्न