Washing Machine Explodes : एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले. भयानक दुर्घटनेत कुटुंबातील एकही सदस्य बचावला नाही. 7 मुलांसह महिला जिवंत जळाली आहे. या भीषण दुर्घटनेत एका मिनिटा संपूर्ण कुटूंब संपलं आहे (Woman and Her 7 Children Killed In House Fire). या घटतेन मृत महिलेचा पती आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. फ्रान्समधील पॅरिसजवळील (paris france) शहरात ही घटना घडली आहे.
पॅरिसच्या पूर्वेला सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या चार्ली-सुर-मार्ने नावाच्या गावात एक भयानक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. वॉशिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने घराला आग लागली. या दुर्घटनेत महिला आपल्या सात मुलांसह जिवंत जळाली आहे.
या आगीचे वृत्त समजताच अग्नीशन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग लागली तेव्हा ही महिला आपल्या सात मुलांसह घराच्या वरच्या मजल्यावर अडकली होती. अग्नीशमन दलाच्या जवानांना वरच्या मजल्यावर अडकलेली ही महिला आणि तिच्या मुलांपर्यंत मदत पोहचवता आली नाही. यामुळे या सर्वांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
ही दुर्घटना नेमकी कशी घडली?
या महिलेने रात्रीच्या वेळेस वॉशिंग मशिन सुरु केली होती. मात्र, यानंतर ही महिला वॉशिंग मशिनचा स्वीच बंद करायला विसरली. थोड्यात वेळात वॉशिंग मशिनमध्ये स्पार्क होऊन शॉर्टसर्किट जाला. यामुळे संपूर्ण घराला आग लागली. मृत महिलेच्या पतीने मुलांना आणि तिला घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यास सांगितले. वरच्या मजल्यावर थांबल्यास यांच्यापर्यंत आगीची झळ पोहचणार नाही असे या महिलेच्या पतीला वाटले. मात्र, बघता बघता यांच संपूर्ण घर पेटले. वरच्या मजल्यावर सात मुलांससह अडकलेल्या या महिलेची अग्नीशमन दलाच्या जवानांनाही सुटका करता आली नाही. अखेरीस सात मुलांसह महिला आगीत जळून ठार झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची काळजी घेणे गरजेचे?
टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशिन, गिजर यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची काळजी घेणे गरजेचे आहे. या उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा धोका असतो. अशा प्रकारच्या अनेक घटना पहायला मिळतात.