Optical Illusion: तीक्ष्ण नजर असलेल्या व्यक्तींनाच दिसेल लपलेलं मांजर; 99% लोकं अपयशी

आम्ही दिलेल्या फोटोमध्ये एक मांजर लपलेली आहे, 5 सेकंदात तुम्हाला सांगायचं आहे की कुठे लपली आहे.

Updated: Sep 28, 2022, 11:22 AM IST
Optical Illusion: तीक्ष्ण नजर असलेल्या व्यक्तींनाच दिसेल लपलेलं मांजर; 99% लोकं अपयशी title=

मुंबई : सोशल मीडियावर आजकाल बरेच ऑप्टिकल इल्युजन व्हायरल होतात. असे फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. मुळात या चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे लपलेल्या आहेत की शोधणारे लाखो प्रयत्न करतात, परंतु ती गोष्ट काही लोकांना सापडत नाही. मात्र काही लोक अशी कोडी चुटकीसरशी सोडवतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक Optical Illusion टेस्ट घेऊन आलो आहोत.

आम्ही दिलेल्या फोटोमध्ये एक मांजर लपलेली आहे, 5 सेकंदात तुम्हाला सांगायचं आहे की कुठे लपली आहे.

तुम्ही जे ऑप्टिकल इल्युजन पाहत आहात ते पेंटिंग आहे. ज्यामध्ये एक महिला घर साफ करताना दिसतेय. त्या महिलेच्या हातात झाडू आहे आणि जवळच एक बादली ठेवल्याचे तुम्ही पाहू शकता. या फोटोमध्ये महिलेशिवाय एक मांजर देखील आहे, जी कुठेतरी लपलेली आहे. 

पण हे लोकांच्या सहज लक्षात येत नाही. ठरवून दिलेल्या वेळेत लपलेली मांजर सापडली तर तुमच्यासारखा हुशार कोणी नाही. मग उशीर कशाचा? तुमची वेळ आता सुरू होत आहे आणि तुमच्याकडे फक्त 5 सेकंद आहेत.

कलाकाराने या फोटोमध्ये मांजर अशा प्रकारे लपवलं आहे, जी शोधणं खूप कठीण आहे. 99 टक्के लोकं मांजर शोधण्यात अपयशी ठरल्याचा दावाही करण्यात आला आहे. जर तुम्हाला तो सापडला असेल तर तुम्ही एक हुशार व्यक्ती आहात. 

ज्यांना मांजर सापडलं नाही त्यांच्यासाठी खालील चित्रात, आम्ही ती कुठे आहे ते दाखवून दिलं आहे.