फोटोमध्ये नक्की काय आहे सांगा, तुम्हाला वेळ आहे 2 सेकंद!

Optical Illusion : तुम्हाला फक्त 2 सेकंदांमध्ये  ओळखायचंय फोटोमध्ये काय आहे नक्की!    

Updated: Oct 1, 2022, 11:49 PM IST
फोटोमध्ये नक्की काय आहे सांगा, तुम्हाला वेळ आहे 2 सेकंद! title=

Optical Illusion Dog or Man : Optical Illusion मुळे बुद्धीला चालना मिळते. निरीक्षणक्षमता सुधारते. Optical Illusion मुळे आयक्यू लेव्हलही वाढते. मानसिक शक्ती वाढते. आम्ही तुमच्यासाठी आणखी चॅलेंज घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहिलात की तुम्हाला सर्वात आधी फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतं. फोटोतील कोडं सोडवताना तीक्ष्ण नजरेसोबत बुद्धीचा कस लागतो. 

तुम्हाला पहिल्या 5 सेकंदामध्ये काय दिसतं हे सांगा. अनेकांना सुरूवातीला कुत्रा दिसला मात्र काहींना माणूस दिसत आहे. लगेच सांगतो नक्की काय आहे असं म्हणत अनेकांनी आव्हान स्वीकारलं. मात्र जेव्हा फोटो पाहिला तेव्हा गोंधळात पडले. कारण फोटोमध्ये सुरूवातीला माणूस असल्याचं अनेकांना वाटतं होतं. 

काही वेळानंतर तो माणूस नसून कुत्रा आहे असं दिसलं मात्र तुम्हीच सांगा नक्की काय आहे.फोटोची रचना अशा प्रकारे आहे की प्रत्येकाची दिशाभूल होत आहे. कुत्र्याचा पंजा आणि शेपूट अशा स्थितीत आहे की ते माणसासारखं दिसत होते. बर्फाच्छादित पंजे त्याचे शूज वाटत होते. कोणालाही वाटेल की हा खरोखरच एक माणूस आहे जो आपली पाठ दाखवत आहे आणि दूर जात आहे. 

 असे ऑप्टिकल भ्रम इंटरनेटवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि लोकांना त्यांचे निरीक्षण कौशल्य आणि तीक्ष्णता तपासायची असल्यास ते कोड क्रॅक करण्याचा प्रयत्न करू शकतात.