आता पांढऱ्या दुधातील काळे बोके समोर येतील- सदाभाऊ खोत

सरकारने दूध दरवाढीचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेतलेला नाही.

Updated: Jul 23, 2018, 05:19 PM IST
आता पांढऱ्या दुधातील काळे बोके समोर येतील- सदाभाऊ खोत title=

सांगली: दूध उत्पादकांना अनुदान मिळणार असल्याने यापूर्वी २३ रुपयाने खरेदी होणारे दूध २८ रुपयांनी खरेदी झाले पाहिजे. हे घडले नाही तर अनुदानावर व शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारणारे पांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडले. ते सोमवारी सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सरकारने दूध दरवाढीचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेतलेला नाही. यापूर्वीच दुधाच्या भुकटीवरील अनुदानाचा निर्णय झाला होता. त्याबद्दल अडचणी निर्माण झाल्याने आता खरेदी करणाऱ्या संघ व संस्थांना ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ५ रुपये वाढीव दर उत्पादकांना मिळाला पाहिजे. ज्यांनी यासाठी आंदोलन केले त्यांनी या गोष्टींवर लक्ष ठेवावे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.