संपूर्ण जगात लिखित स्वरुपात 195 देश अस्तित्वात असून, 193 देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आहेत.
या सर्व देशांपैकी सर्वात आधी अस्तित्वात आलेला देश कोणता माहितीय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भारत वाटत असेल तर तसं नाहीये.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या यादीनुसार इराण हा जगातील सर्वात जुना देश आहे, ज्याची पाळमुळं इसवी सन 3200 पूर्वपासून आढळतात.
विविध देशांमध्ये मानवी सभ्यतेची सुरुवात नेमकी कधीपासून झाली या आधारी ही यादी तयार करण्यात आली आहे.
जिथं पहिल्या स्थानी इराण आणि त्यामागोमाग इजिप्त, व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.
यादीत पाचव्या स्थानी कोरिया, सहाव्या स्थानी चीन आणि सातव्या स्थानी भारताच्या नावाची नोंद आहे.