अबब! किंमत ऐकूनच नशा चढेल... जगातल्या सर्वात महागड्या दारुची बॉटल 'इतक्या' कोटी रुपयांना
जगात अनेक ब्रॅंड आहेत. ज्यांच्या दारू या महागड्या दारूंच्या ब्रॅंडमध्ये येते.
Armand de Brignac Midas या महागड्या शॅम्पेनचा बाटलीची किंमत 1.64 अब्ज रुपये आहे. 30-लिटरच्या या बाटलीचे वजन तब्बल 45 किलोग्रॅम इतके आहे.
सगळ्यात महागड्या जीनची किंमत ही 1.64 कोटी रुपये इतकी आहे. क्रिस्टल्सपासून बनवलेल्या या दारूचा जगभरात केवळ 5 बाटल्या असून करीम रशीद यांनी डिझाईन केल्या आहेत
जगातील सर्वात महाग टकीला Ley.925 असून या टकिलाच्या एका बाटलीची किंमत 28.7 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे हा टकीला 41,000 हिऱ्यांनी सजवलेल्या प्लॅटिनम बाटलीमध्ये येतो.
डिवा वोडका हा या झऱ्याच्या पाण्यापासून बनवल्याचा दावा केला जातो विशेष म्हणजे या दारूचा बनवणायचा प्रक्रियेत डिस्टिल्ड केल्यानंतर. ते हिरे, रत्न आणि कोळशापासून बनवलेली वाळू वापरून फिल्टर केले जाते. या व्होडकाची किंमत 8.2 कोटी रुपये इतकी आहे.
जगातील सगळ्यात महागड्या विस्कीची किंमत ही 1.45 कोटी आहे. या व्हिस्कीचे नाव 'द डालमोर 62 स्कॉच व्हिस्की' असे आहे. 1942 साली तयार झालेल्या या व्हिस्कीच्या जगभरात फक्त 12 बॉटल आहेत.
(All Photo Credit : Freepik)