₹ 166000000000000 खर्च करुन बांधलाय 'जगातील सर्वात मोठा मॉल'; यासमोर बुर्ज खलिफाही फिका!

दुबई म्हणजे...

दुबई म्हटलं की लोकांना आठवणारी पहिली गोष्ट म्हणजे जगातील स्रवात उंच इमारत बुर्ज खलिफा!

एकमेव 10 स्टॉर हॉटेल

बुर्ज खलिफाबरोबरच जगातील एकमेव 10 स्टॉर हॉटेल अललेलं बुर्ज अल-अरबचे फोटोही चांगलेच चर्चेत असतात.

जगातील सर्वात मोठा मॉल

मात्र जगातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखला जाणारा 'द दुबई मॉल' सुद्धा येथील एक प्रसिद्ध आकर्षण आहे.

दोघांपेक्षाही अधिक पैसा केला खर्च

'द दुबई मॉल' बनवण्यासाठी बुर्ज खलीफा आणि बुर्ज अल-अरब तयार करण्यापेक्षाही अधिक पैसा खर्च करण्यात आला आहे.

एकूण एरिया किती?

सीएनबीसीने दिलेल्या माहितीनुसार 1.2 कोटी स्वेअर फूट क्षेत्रफळावरील हा मॉल बनवण्यासाठी 1.66 लाख कोटी डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच आकड्यात सांगायचं झालं तर 166000000000000 इतका पैसा खर्च करण्यात आला आहे.

बुर्ज अल-अरबचा खर्च किती?

बुर्ज अल-अरब तयार करण्यासाठी 8330 खोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

बुर्ज खलीफाचा खर्च किती?

बुर्ज खलीफा उभारण्यासाठी 12500 कोटी रुपये खर्च केले आहेत.

कोणी बांधला हा मॉल?

हा मॉल कन्सोलिडेटेड कॅन्ट्रॅक्टर कंपनी आणि डुटको बाल्फोर बीअटी यांनी संयुक्तरित्या बांधला आहे. एमार प्रॉपर्टीज मॉल मुख्य निर्माती कंपनी आहे.

24.3 टक्के वाटा या व्यक्तीकडे

'द दुबई मॉल'ची मालकी एमार पॉपर्टीजकडे आहे. या कंपनीचे संस्थापक मोहम्मद अली अलब्बार आहेत. यामध्ये सध्या त्यांचा 24.3 टक्के वाटा आहे.

मॉलमध्ये काय काय आहे?

'द दुबई मॉल'मध्ये 1200 रिटेल आऊटलेट, 200 हून अधिक फूड पॉइंट आणि 150 हून अधिक लक्झरी शॉपिंग पॉइण्ट्स आहेत. इथे अंडरवॉटर प्राणी संग्रहालयही आहे.

दरवर्षी 10 कोटी पर्यटक

'द दुबई मॉल' हा जगातील सर्वाधिक व्हिजीट केलं जाणारं रिटेल आणि लाइफस्टाइलसंदर्भातील ठिकाण आहे. येथे दरवर्षी 10 कोटी पर्यटक येतात.

VIEW ALL

Read Next Story