पृथ्वी गोल असल्याचं आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत पण आपल्याला पृथ्वी गोल असल्याचे का जाणवत नाही.
पृथ्वीसमोर माणूस असा किती मोठा असेल ? एखाद्या मोठ्या फुटबॉलच्या मैदानात मुंगीचा आकार किंवा त्याहूनही लहान, खरतर हेच या प्रश्नाचे उत्तर
ज्याप्रमाणे मुंगी तिच्या उंचीमुळे जास्त लांब बघू शकत नाही त्याचप्रमाणे माणूससुद्धा त्याच्या उंचीनुसार ठरावीक अंतरापर्यंतच पाहू शकतो.
आपण या पृथ्वीसमोर एवढे लहान आहोत की आपल्याला पृथ्वी गोल असल्याचे न दिसता सपाट दिसते.
विज्ञानानुसार, पृथ्वी प्रत्येक 5 किमी नंतर वक्र आहे, म्हणजेच तिच्या पृष्ठभागावर एक परिभ्रमण आहे .वाढत्या शहरीकरणामुळे आपण 5 किमी सोडा तर 1 किमी दूर देखील पाहू शकत नाही.
ज्यावेळी उत्तर पृथ्वीच्या दिशेने खूप उंचीवरून पाहिले जाईल त्यावेळी कदाचित पृथ्वी गोल दिसू शकते.
जर तुम्ही एखाद्या उंच टॉवर किंवा एखाद्या उंच ठिकाणावरून पाहिलं तर पृथ्वीचा वक्र दिसू शकतो.
जर तुम्ही जगातील सर्वात उंच इमारतीच्या टोकावरून म्हणजेच बुर्ज खलीफावरून पाहिलं तर तुम्हाला पृथ्वीचा वक्र भाग दिसेल.
विज्ञानानुसार, पृथ्वी प्रत्येक 5 किमी नंतर वक्र आहे आणि बुर्ज खलिफावरून 95 किमी पर्यंतच अंतर आपण पाहू शकतो.