ATM

ATM चा PIN चार आकड्यांचाच का असतो माहितीये? वाचा पत्नीने दिलेल्या सल्ल्याची रंजक गोष्ट

एटीएम मशीन

एटीएम मशीन म्हणजे अनेकांसाठीच अप्रूप. म्हणजे एका इवल्याशा कार्डच्या आणि मशीनच्या मदतीनं चक्क पैसेच बाहेर येतात. कमाल नाही का?

आर्थिक व्यवहार

आर्थिक व्यवहार करण्यासाठी सध्या बऱ्याच कार्डचा वापर केला जातो. Debit card, Credit card त्यावर मिळणाऱ्या अनेक सवलती आणि त्या सवलतींचा फायदा घेणारे तुम्हीआम्ही सगळे.

एटीएम पिन

अशा या एटीएमचा पिन कोणामुळं संपूर्ण जगाच्या वापरात आला माहितीये? याची एक रंजक कहाणी आहे. त्यासाठी साधारण 55 वर्षे मागे जावं लागेल.

पैसे बाहेर आले तर....?

John Shepherd-Barron यांनीच केलेल्या दाव्यानुसार अंघोळ करत असताना त्यांना मशीनमधून एखादं चॉकलेट बाहेर येतं, तसे पैसे बाहेर आले तर....? हा विचार त्यांच्या मनात आला होता.

जन्माला आला ATM Pin

ATM च्या संकप्लनेनं जन्म तर घेतला. आता प्रश्न होता ती वापरणाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा. यासाठी जन्माला आला ATM Pin.

6 आकडी क्रमांक

बीबीसीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एटीएमचा शोध लावणाऱ्या या व्यक्तीनं सुरुवातीला एक 6 आकडी क्रमांक एटीएम पिन म्हणून वापरण्याचा ठरवलं.

पत्नीचा नकार

पतीच्या या निर्णयाला पत्नी कॅरोलिननं मात्र नकार देत हा प्रस्ताव थेट स्वयंपाकघरातूनच धुडकावला.

4 आकडी पिन

आपल्याला फक्त 4 आकडेच लक्षाच राहतील, असं ती म्हणाली आणि त्या क्षणापासून एटीएमला सुरक्षिततेच्या कारणास्तव 4 आकडी पिन देण्यात आला.

आहे की नाही ही रंजक गोष्ट?

आहे की नाही ही रंजक गोष्ट? तेव्हा इथून पुढं एटीएममधून जेव्हाकेव्हा पैसे काढाल किंवा एखादा व्यवहार कराल तेव्हा या पिनची रंजक गोष्ट नक्की लक्षात आणा.

VIEW ALL

Read Next Story