विमान प्रवासाच्या सुरुवातीलाच प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येते. ज्या गोष्टी विमानात नेता येत नाहीत त्या विमानतळावरच काढून ठेवल्या जातात.
प्रवासी आणि एअरक्राफ्ट अर्थात विमानाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव काही गोष्टी सोबत नेण्यास परवानगी दिली जात नाही. नारळाचाही यामध्येच समावेश होतो.
नारळ हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळं तो विमानात नेता येत नाही. सुकवलेला किंवा संपूर्ण नारळ तुम्हाला विमानात कधीच नेता येत नाही. चेक-इन दरम्यानच तो बॅगेतून काढण्यास सांगितला जातो.
विमानात ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असून, यामध्ये मद्य, सिगरेट, तंबाखू, अमली पदार्थ, हेरोईनचा समावेश आहे. याशिवाय पेपर स्प्रे, काडेपेटी, पॉवरबँक, रेजर, ब्लेड थिनर, नेल कटर, लायटरसुद्धा विमानात नेता येत नाही.
प्रत्येक विमान प्रवासात विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीनुसार सामान ने- आण करण्याचे नियम बदलत असतात.
ज्वलनशील पदार्थांची यादी जवळपास सर्व विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी एकसारखीच ठेवल्याचं पाहायला मिळतं.
तेव्हा कधीही विमानप्रवासाला निघणार असाल तर चुकूनही नारळ मात्र सोबत नेऊ नका.