कोहिनूर हिरा त्याच्या लकाकीसोबतच, त्यामागच्या ऐतिहासिक संदर्भांसाठीही ओळखला जातो. या हिरा पहिल्यांदा भारतातच सापडला होता.
जवळपास 800 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील गुंटूर इथं कोल्लूरच्या खाणीतून हा हिरा बाहेर काढण्यात आला होता. या हिऱ्याचं वजन आहे 186 कॅरेट.
कोहिनूर हिऱ्यावर काकातिया वंशाच्या शासकांची मालकी होती. त्यांनी हा हिरा भद्रकाली देवीच्या डोळ्यात मढवला होता.
14 व्या शतकात अलाउद्दीन खिल्जीनं काकातियांवर हल्ला करत कोहिनूर हिसकावून घेतला होता. सध्या तोच कोहिनूर ब्रिटीश राजघराण्याच्या ताब्यात आहे.
या मौल्यवान हिऱ्याची किंमत आहे, 49,62,01,82,700 रुपये
हा हिरा फक्त भारतच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आश्चर्याचा विषय असून, भरभराटीचं प्रतिकही आहे असं म्हटलं जातं.