अंतराळाबद्दल माणसाच्या कुतूहलाला अंत नाही. जगभरातील अनेक अंतरावीर अवकाशात संशोधनासाठी जात असतात.
पण तुम्हाला हे माहित आहे का एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचे काय केले जाते?
अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि भारतीय स्पेस एजन्सी इस्त्रोने जगातील अनेक अंतराळवीर अवकाशात पाठवले आहेत. अंतराळवीरांना बरेच महिने अंतराळात रहावे लागते.
अनेकवेळा अंतराळ मोहिम धोकादायक ठरतात. अंतराळवीरांना आपला जीवही गमवावा लागतो. आतापर्यंच बऱ्याच अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे.
अंतराळ मोहिम बरेच दिवस चालतात त्यामुळे मृतदेह इतके दिवस जतन करून ठेवणं शक्य नसतं.
अंतराळयानात कमी जागा असल्याने मृतदेह फार काळ ठेवता येत नाही त्यामुळे मृतदेह एअर लॉक सूटमध्ये पॅक करून अवकाशात सोडला जातो.
अंतराळात गुरूत्वीकर्षण शक्ती कमी असल्याने मृतदेह अनेक वर्ष विश्वाच्या अंधारात फिरत राहते. तापमान थंड असल्याने मृतदेह खराब होत नाही.
जर अवकाशयानाच्या कर्मचाऱ्यांची इच्छा असेल तर मृतदेह परत आणू शकतात पण परिस्थिती काय आहे त्यावरून निर्णय घेतला जातो.
जर अवकाशयानात जागा नसेल आणि मोहिम संपायला बरेच दिवस बाकी असतील तरल मृतदेह अवकाशात सोडून दिला जातो.