मुलीसोबत राहू नका, मोबाईल वापरू नका; पाकिस्तानातील 'हे' अजब नियम डोकं चक्रावतील
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली. या विधेयकानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण होताच मुलांचं लग्न करणं बंधनकारक असावं. या आदेशाचं पालन न करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी.
असं म्हणतात की, पाकिस्तानमध्ये परवानगीशिवाय एखाद्या व्यक्तीच्या फोनला स्पर्श करणं बेकायदेशीर असतं. कोणी चुकूनही असं केलं तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र असते.
पाकिस्तानात काही शब्दांतं इंग्रजी भाषांतर करण्यास परवानगी नाही. इथं काही शब्दांचं इंग्रजी भाषांतर बेकायदेशीर मानलं जातं. अल्लाह, मस्जिद, रसूल आणि नवी हे त्यापैकी काही शब्द.
पाकिस्तानात शिक्षणासाठी कर भरावा लागतो. एखाद्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च 2 लाख रुपयांहून अधिक आहे तर त्यांना कर भरावा लागतो.
पाकिस्तानात कोणताच मुलगा त्याच्या प्रेयसीसोबत राहू शकत नाही. असं केल्यास त्यांना कारावासाची शिक्षा होते. लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र राहू शकत नाहीत असं इथला कायदा सांगतो.
पाकिस्तानातील कोणताही नागरिक इस्रायलला जाऊ शकत नाही. किंबहुना पाकिस्तान शासनाकडून इस्रायलला जाण्यासाठी व्हिसा दिला जात नाही.