अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासाने एक रंजक जीफ इमेज शेअर केली आहे.
जगातिक एक अत्यंत महत्त्वाचा देश स्वत:ची राजधानी चक्क वाळवंटामध्ये शिफ्ट करत आहे.
याच शिफ्टींगचे दर्शन नासाने आपल्या पोस्टमध्ये करुन दिलं आहे.
नासाने शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिला फोटो हा 2017 सालातील आहे. या फोटोत केवळ वाळवंट आणि काही नद्या दिसत आहेत.
दुसरा फोटो हा त्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच आता काढलेला आहे. या फोटोत पूर्वीच्याच भागामध्ये अनेक इमारती उभ्या राहिल्याचं पाहायला मिळत आहे.
हा केवळ असं शहर वसवायचं ठरलं तेव्हाचा या ठिकाणाचा फोटो. यापूर्वीचे दोन्ही फोटो इजिप्तमधील एकाच ठिकाणचे आहे. इजिप्त आपल्या राजधानीचं शहर बदलत असून मागील अनेक वर्षांपासून हे काम सुरु आहे.
सध्याची राजधानी असलेल्या कौरो शहराच्या पूर्वकडे असलेल्या वाळवंटामध्ये नवं शहर वसवलं जात असून हे शहर कौरोपासून 45 किलोमीटरवर आहे.