शिव्या देणे हे वाईट लोकांचे संस्कार आहेत. यामुळे लहान पणापासूनच मुलांना शिव्या देणे वाईट आहे अशी शिकवण दिली जाते.

खूप तणावात असल्यास शिव्या देणे मानसिक स्वस्थास्थ्यासाठी फायदेशीर असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

न्यूजर्सी येथील कीन विद्यापीठातील संशोधकांनी या संदर्भात एक सर्वेक्षण केले होते.

विद्यार्थ्यांवर विशिष्ट प्रयोग करुन करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात शिव्या देण्याचे फायदे समोर आले आहेत.

या प्रयोगात सभागी झालेल्या विद्यार्थ्यांची बोटे बर्फाच्या पाण्यात काही वेळ बुडवून ठेवली गेली. जे विद्यार्थी शिव्या देणारे होते ते अधिक काळ बोटे बर्फात ठेऊ शकले पण जे शिव्या देणारे नव्हते त्यांना ते शक्य झाले नाही.

शिव्या देऊन बोलणारे लोक समाधानी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगतात.

शिव्या दिल्याने स्ट्रेस कमी होतो आणि मेंदूवरील ताण कमी झाल्याने त्यांचे आयुष्य वाढते.

VIEW ALL

Read Next Story