आजचा दिवस आहे 13 तास 25 मिनिटांचा; जाणून घ्या यामागील कारण...
आज सगळीकडे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय. त्याशिवाय आजचा दिवस अजून एका कारणासाठी महत्त्वाचा आहे.
आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आजचा दिवस हा 13 तास 25 मिनिटांचा असणार आहे.
तर आजची रात्र ही सर्वात लहान रात्र असणार आहे. साधारण 10 तास काही मिनिटांची रात्र असणार आहे.
पृथ्वी सूर्याभोवती आपली एक फेरी 365.25 दिवसांमध्ये पूर्ण करतो. या प्रक्रियाला सौर वर्ष असं म्हणतात.
सौर वर्षात दिवस आणि रात्र एकसारखी नसून कधी लहान किंवा मोठी असतात.
विविध ऋतू आणि दिवस-रात्र एकसमान न राहण्याचे मुख्य कारण पृथ्वीचा 23.5 अंशातून झुकलेला अक्ष (Axis) आहे. पृथ्वीचे मुख्य दोन भाग आहेत, 'उत्तर गोलार्ध' (Northern Hemisphere) आणि 'दक्षिण गोलार्ध' (Southern Hemisphere).
आतापर्यंत फक्त एकदा म्हणजेच 22 जून 1975 ला सर्वात मोठा दिवस नोंदवला गेला होता. आज घडणाऱ्या या खगोलीय प्रक्रियेला Summer Solstice असं म्हटलं जातं.