पहिली नोकरी

कोण गॅस अटेंडंट, कोण पेपरवाला; Dream Job देणाऱ्या अब्जाधीशांची पहिली नोकरी माहितीये?

Jul 03,2023

काम मोठं किंवा लहान नसतं

असं म्हणतात की कोणतंही काम मोठं किंवा लहान नसतं. या मंडळींच्या जीवनप्रवासाचा भूतकाळ उलगडून पाहिल्यास हेच लक्षात येत आहे.

आदर्शस्थान

विविध संस्थांच्या संस्थापक किंवा संचालकपदी असणारी ही मंडळी त्यांच्या पदापेक्षा त्यांच्या तत्वांमुळं अनेकांच्या आदर्शस्थानी असतात.

भारतीय उद्योग जगत

भारतीय उद्योग जगतासोबत आंतरराष्ट्रीय क्षेत्रातूनही अशीच काही मंडळी अनेकांच्याच आदर्शस्थानी आहेत. अशा या मंडळींनी कोट्यवधींचं साम्राज्य उभारण्यापूर्वी पहिली नोकरी कुठं केलेली माहितीये?

धीरुभाई अंबानी

धीरुभाई अंबानी गॅस स्टेशनवर अटेंडंट म्हणून काम करत होते. येमेन येथे त्यांनी ही नोकरी केली होकती. तिथं त्यांना जवळपास 300 रुपये महिना इतकाच पगार मिळत होता.

रतन टाटा

टाटा उद्योग समुहात मानाचं स्थान असणाऱ्या रतन टाटा यांनी 1961 मध्ये जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये नोकरी केली होती. ज्यानंतर ते टाटा मोटर्समध्ये रुजू झाले होते.

जेफ बेजोस

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी सुरुवातीला आचाऱ्याची नोकरी केली होती. ते मॅकडॉनल्ड्समध्ये फ्राय कूक म्हणून काम पाहायचे जिथं त्यांना ताशी 2 डॉलर रुपये मिळायचे

वॉरन बफेट

स्टॉक मार्केटमधील दमदार गुंतवणुकदार म्हणून ओळख असणाऱ्या वॉरन बफेट (Warren Buffett) यांनी वॉशिंग्टन पोस्ट हे वृत्तपत्र वाटण्यासाठीचं काम केलं होतं. यासाठी त्यांना महिन्याला 175 डॉलर्स इतके पैसे मिळत होते.

नारायण मूर्ती

Infosys चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी रिसर्च असोसिएट म्हणून पहिली नोकरी केली होती. IIM अहमदाबादसाठीच्या एका फॅकल्टीसाठी ते काम करत होते.

VIEW ALL

Read Next Story