धार्मिक स्थळावर गेलेले 50 हजार भाविक गायब, काय आहे प्रकरण?

भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तानातून एक धक्कादायक वृत्त समोर आलंय.

धार्मिक यात्रेसाठी गेलेले 50 हजार भाविक गायब झाले आहेत.

आता हा मुद्दा पाकिस्तानच्या संसदेत गाजतोय.

50 हजार पाकिस्तानी भाविक गायब असल्याची माहिती धार्मिक प्रकरणांच्या मंत्र्यांनी दिली.

हे सर्व नागरिक धार्मिक कार्यासाठी इराकला गेले होते.

शिया मुस्लिम समुदायाचे लोक पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात राहतात.

शिया समुदायासाठी इराकची अरबाईन आणि आशूराची यात्रा महत्वाची मानली जाते.

पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे लोकं धार्मिक व्हिसाच्या आधारे इराकला जाऊन तिथेच राहतायत.

पाकिस्तानी नागरिक आमच्या देशात गैर प्रकारे राहत असल्याचे इराकने म्हटलंय.

दरवर्षी लाखो भाविक इराकमध्ये धार्मिक स्थळांना भेट द्यायला जातात.

VIEW ALL

Read Next Story