या देशात दारू पिण्यासाठी फाशीची शिक्षा दिली जाते

फाशीची शिक्षा

हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण जगात एकच असा देश आहे जिथे दारू पिताना पकडल्यास फाशीची शिक्षा दिली जाते.

कोणता आहे देश?

हा देश दुसरा कोणी नसून इराण आहे. इराणमध्ये जर कोणी दारू पिताना पकडले तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. मात्र असे असूनही तेथे लोक दारू पितात.

विषारी दारू प्यायल्याने गेला जीव

दरम्यान, विषारी दारूच्या सेवनामुळे तिथल्या काही लोकांना जीव गमवावा लागल्याचे काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये अलीकडेच समोर आले आहे. यानंतर इराणमधील दारूच्या नियमांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अनेकांना झालीय अटक

त्यामुळे इराणमध्ये दारू पिऊ नये म्हणून कठोर नियम करण्यात आला होता. इराणमध्ये दारूवर बंदी आहे, मात्र असे असतानाही अनेक इराणी तरुण दारू पिताना पकडले जात आहेत.

कठोर शिक्षा

इराणमध्ये बेकायदेशीरपणे दारूचे उत्पादन किंवा तस्करी केली जाते. तिथे आधी दारू प्यायला पकडले तर तुरुंगवास किंवा फटके मारण्याची शिक्षा, नंतर वारंवार दारू प्यायल्यास फाशीही होऊ शकते.

भारतातही बंदी

भारतातही काही राज्यांमध्ये मद्यपानावर बंदी आहे. मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story