या कपलचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे त्याची मुलगी सहाव्या पत्नीच्या वयापेक्षा मोठी आहे.
हिसाम यांनी 16 वर्षांच्या कोएने रोड केमार्गोच्या काही नातेवाईकांना आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी देऊ केली आहे. यात तिच्या आई आणि सख्ख्या मावशीचाही समावेश आहे.
उद्योगपती हिसाम हुसेन देहीनी हे 14 मिलिअन ब्राझिलिन रियाल संपत्तीचे मालक आहेत. लग्नाला विरोध झाल्याने त्याने आपल्या पक्षाचाही राजीनामा दिला.
उद्योगपती हिसाम हुसेन देहीनी यांची याआधी पाच लग्न झाली असून त्यांना 16 मुलं आहेत. त्यांचं पहिलं लग्न 1980 मध्ये झालं होतं. 2000 साली उद्योपती हिसाम यांना अंमलीपदार्थांच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.
त्या मुलीचं नाव कोएने रोड केमार्गो असं आहे. हिसाम आणि कोएनने 15 एप्रिलला लग्न केलं. या लग्नावर ब्राझिलमधल्या लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
16 वर्षांच्या या मुलीने चाइल्ज ब्युटी क्वीनचा खिताबही पटकावला होता. उद्योगपती हिसामचा तिच्यावर जीव जडला. विशेष म्हणजे मुलीनेही त्याच्या प्रेमाचा स्विकार केला आणि दोघांनी लग्नही केलं.
ब्राझिलच्या 65 वर्षीय उद्योगपतीचं नाव आहे हिसाम हुसेन देहीनी (Hissam Hussein Dehaini). हिसाम हे अब्जाधीश असून ब्राझिलमधल्या एका शहराचे ते महापौरही आहेत. त्यांनी नुकतंच एका सोळा वर्षांच्या मुलीबरोबर लग्न केलं.