ऑस्ट्रेलियातील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचारी संघटना दीर्घ काळापासून देशातील कामाची पद्धती सुधारण्याची मागणी करत आहेत. देशातील 'बॉस कल्चर' सुधारून कामात समतोल साधला जावा, अशी मागणी सातत्याने होत होती.
आता ऑस्ट्रेलियाचे रोजगार मंत्री टोनी बर्क यांनी यासंबंधीचे विधेयक तयार केले असून ते या आठवड्यात संसदेत मांडले जाणार आहे.
फेडरल सरकारने प्रस्तावित असलेल्या कायद्यांमधील बदलांमध्ये 'राईट टू डिस्कनेक्ट' ची तरतूद समाविष्ट आहे. म्हणजे कामानंतर तुमचा फोन बंद करा, तुमचे जीवन जगा.
त्यामुळे आता कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या बॉसकडून 'कोणत्याही कारणाशिवाय' ड्युटीनंतर बोलावले जाणार नाही. कोणत्याही ईमेलला उत्तर देण्याची आवश्यकता नाही.
काम आणि जीवन यांच्यात समतोल साधणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. जर याची अंमलबजावणी झाली नाही तर कर्मचारी 'फेअर वर्क कमिशन'कडे तक्रार करू शकतील.
असे करण्यास सांगितले तर कर्मचारी बॉसविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल आणि नंतर बॉसवर कारवाई केली जाईल. मात्र, नुकसान भरपाईची रक्कम अद्याप समितीने ठरवलेली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे असे अधिकार देणारे कायदे फ्रान्स, स्पेन आणि युरोपियन युनियनच्या इतर देशांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहेत. भारतात मात्र याचा अद्यापही विचार झालेला नाही.