कंडोमच्या वापराबाबत जगभरातील सरकारे कार्यक्रम राबवत आहेत.जोडप्यांनी संबंध बनवताना कंडोम वापरावा यासाठी लोकांना जागरूक करत आहे.

लोकसंख्या आवाक्यात राखण्यासाठी सरकार ही पावले उचलत आहे.

चला तर मग कंडोमची निर्मिती कशी केली जाते आणि आतापर्यंत त्याच्या निर्मितीमध्ये कोणते बदल झाले आहेत हे जाणून घेऊया.

सुरुवातीला प्राण्यांची आतडी, माशांचे पर, प्राण्यांची शिंगे, तेल लावलेला रेशीम कागद, कासवाचे कवच, तागाचे कापड आणि मेंढीच्या चामड्यांपासून कंडोम बनवले जायचे.

सर्वात जुने कंडोम डुकराच्या आतड्याचा वापर करून तयार केले गेले होते.

16 व्या शतकापर्यंत, कंडोम प्रामुख्याने प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवले जात होते पण त्याचा उत्पादनखर्च खूप होता.

कंडोम प्रथम रोममध्ये लिनेनपासून तसेच मेंढ्या आणि शेळ्यांच्या आतड्यांपासून किंवा मूत्राशयापासून तयार केले गेले.

रबर कंडोम सर्वप्रथम 1855 मध्ये उदयास आले, त्यानंतर लेटेक्स कंडोम 1920 मध्ये उपलब्ध झाले.

एका कथेनुसार , गर्भनिरोधकाचा शोध कंडोम नावाच्या माणसाने इंग्लंडच्या चार्ल्स II साठी लावला होता.

आधुनिक कंडोम प्रथम 1870 मध्ये विकसित केले गेले.

VIEW ALL

Read Next Story