आफ्रीकी देश मोरक्को भूकंपाने हादरला. शुक्रवारी आलेल्या तीव्र भूंकपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 700 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
मोरक्कोतल्या भूवैज्ञानिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी होती. मोरक्कोत गेल्या 120 वर्षात आलेला सर्वात शक्तीशाली भूकंप असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
भूकंप आला त्यावेळी लोकं आपल्या घरी गाढ झोपेत होते. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोकं गाडली गेली.
मोरक्कोतली जगप्रसिद्ध ऐतिहासिक कौतोबिया मशिदीचा मीनारलाही भूकंपामुळे तडे गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भूकंपामुळे मोरक्को देश अक्षरश: उद्धव्सत झाला असून भूकंपग्रस्त भागाचे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडेल. सोशल मीडियावर इथले अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
भूकंपाचा केंद्रबिंदू एटलस पर्वताजवळच्या इघिल गावात असल्याचं सांगतिलं जातंय. हे गाव मोरक्को शहरपासून 70 किलोमीटर दुरीवर आहे. पोर्तुगल आणि अल्जेरिया देशातही भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपामुळे मोरक्कोत हजारो लोकांचे संसार उघड्यावर आलेत. हजारो लोकं बेघर झाली असून जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शक्य तितक्या मदतीचं आश्वासन दिलं आहे.